माध्यमिक शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी सह.पतपेढी वार्षिक सभा

| खांब-रोहा । वार्ताहर ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्य.शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी सह.पतपेढी, ता.रोहा या पतपेढीची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि.9)रोजी अंजूमन हायस्कूल रोहा येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. पतपेढीचे मुख्य मार्गदर्शक अविनाश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विद्यमान अध्यक्ष सुरेश जंगम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेप्रसंगी उपाध्यक्ष नितिन गोरिवले, सचिव संजीव शेरमकर,संचालक सुप्रिया क्षीरसागर, सुनील थिटे,प्रविण मरवडे आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

या सभेमध्ये मागील सभेचे प्रोसेसिंग वाचन करून व मागील वर्षाचा ताळेबंद, तैरीज पत्रक व नफा-तोटा यांचे वाचन करून मंजुरी देण्यात आली,गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी तसेच विशेष प्राविण्य प्राप्त सभासदांचा सन्मान करण्यात आला तसेच कर्ज मर्यादा वाढविणे व आँडिट रिपोर्ट मंजूर करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या सभेत अविनाश म्हात्रे, नितिन गोरिवले, सुरेश जंगम यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. तर सभेचे सुत्रसंचलन मुरलीधर कोंजे यांनी तर आभार संजीव शेरमकर व्यक्त करून सभेची सांगता करण्यात आली.

Exit mobile version