। उरण । प्रतिनिधी ।
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने युवा सामाजिक संस्था खारघर नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य के.ए. शामा अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा, नम्रता व योग्यता विकसित झाली पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांनी आपले प्रभावी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
तसेच, प्रमुख मार्गदर्शक श्रीमती सरस्वती शिंदे यांनी व्यक्तीच्या क्षमता, मिळणार्या संधी आपले विकनेस व संभाव्य धोके याविषयी जागरूक राहिले पाहिजे असे सांगून मी काय आहे? याचा शोध घ्यावा. स्वतःला सेल्फ मिरर मध्ये पाहून देहबोली विकसित करावी व स्पेसफिक गोल निश्चित करून आत्मविश्वास निर्माण करावा, असे प्रतिपादन केले. यावेळी दीपक देवरे, विनिता तांडेल, रियाज पठाण व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.