। अलिबाग। वार्ताहर ।
सोनी मराठी वाहिनीवरील मराठी इंडियन आयडलचे अगदी पहिले वाहिले पर्व सर्वच प्रेक्षकांना अतिशय भावले होते. इंडियन आयडलच्या या पहिल्याच परवाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवले. आणि या मराठी इंडियन आयडलचा महाअंतिम सोहळा २० एप्रिलला पार पडला. मराठी इंडियन आयडलच्या पर्वाचा पहिला मराठी इंडियन आयडल हा रायगडातील कोप्राली-उरणचा सागर म्हात्रे ठरला. सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोप्राली-उरणचा सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडल
