कोप्रोलीचे कृषीसेवा केंद्र सुरु

। उरण । वार्ताहर ।
कोप्रोली येथील जे .पी पाटील कृषी सेवा केंद्र हे खत विक्री बाबत काही तांत्रिक अडचणी आल्याने बंद होते.सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गावंड यांच्या प्रयत्नाने खत विक्री सेवा पूर्ववत करण्यात आले
कृषी अधिकारी यांनी जे पी पाटील कृषी सेवा केंद्रास भेट दिली .व सेवा केंद्रा संबंधित कागदपत्रे बाबतीत चौकशी केली .काही कागद पत्रांची पूर्तता न केल्याने सदर कृषी सेवा केंद्र बंद करावे असे आदेश दिले .त्यानुसार केद्र बंद होते .त्यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर खत मिळाले नाही .या संदर्भात जगजीवन पाटील यांना खत विक्री परवाना बद्दल उरण कृषी अधिकारी यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की .माझ्याकडे सर्व पेपर तयार होते माझ्या सेवा केंद्राचे परवाना 29 जून 2025 पर्यंत आहे मी माझे खत विक्री परवाना नुतनीतकरण करण्यासाठी अलिबाग येथे पाठविले आहे .ते आल्यानंतर दाखवितो .परंतु कृषी अधिकारी यांनी एकूण न घेता सेवा केंद्र बंद करण्याचे आदेश दिले व तशा प्रकारचे आदेशही दिले .
ही बाब मुकुंद गावंड लक्षात येताच त्यांनी पत्रकार यांना सर्व प्रकार साांगितला.शेतकर्‍यांना वेळेवर खत मिळणे जरुरीचे आहे .ते वेळेवर न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी झाल्याचे दिसून येत होते परंतु या समस्येवर मार्ग काढून कृषी सेवा केंद्र सुरु करण्यात आले

Exit mobile version