| कोल्हापूर | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणार्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. गेल्या महिन्याभरापासून तो फरार होता. अखेर सोमवारी दुपारी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी तेलंगणामधून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला मंगळवारी सकाळी कोल्हापूरमध्ये आणले गेले आणि दुपारी 12 च्या सुमारास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी कोरटकरची सात दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र, जिल्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.