पेढांबेत कृष्ण जन्मोत्सव उत्साहात

| वाघ्रण | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील खारपेढांबेत पारंपरिक कृष्णजन्म सोहळा उत्साहात संपन्न झाला. वाघ्रण ग्रा.पं. माजी सरपंच शेकापचे दिवंगत कार्यकर्ते कै. केसरीनाथ नथू पाटील यांच्या निवासस्थानी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त रात्री ग्रंथ वाचन करण्यात आले. सेवानिवृत प्रा. शिक्षक पद्माकर पाटील गुरुजींनी वाचन करून श्रीकृष्ण कथासार व जन्मकहाणी उपस्थितांना ऐकवली. या उत्सवाची सांगता मध्यरात्री आरती आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला ग्रा.पं. माजी उपसरपंच सरोज पाटील, सदस्या वत्सला पाटील, विवेक पाटील यांच्यासह अनेक महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.

Exit mobile version