कृष्णा जवके यांचे निधन

| सुकेळी | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील मेढा गावातील कृष्णा बाळाराम जवके यांचे वयाच्या 68 व्या वर्षी गुरुवारी (दि.8) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मेढा येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला विविंध क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जवके यांचे दशक्रिया विधी शनिवारी (दि.17) तर उत्तरकार्य सोमवारी (दि.19) राहत्या घरी होणार असल्याचे मुलगा राजेश जवके यांनी सांगितले आहे.

Exit mobile version