कृष्णाला सुवर्ण; सुहासला रौप्य

। टोक्यो । वृत्तसंस्था ।
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या कृष्णा नागरने इतिहास रचत भारताला पाचवे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. कृष्णा नागरने रविवारी बॅडमिंटनमध्ये पुरुष एकल एसएच-6 स्पर्धेत फायनलमध्ये हॉगकाँगच्या चू मन काईचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले आहे. प्रमोद भगतने शनिवारी एसएल 3 स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजतेपज पटकावले आणि त्यानंतर आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्ण पदक आहे. टोकियो पॅरोलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरला सुर्वण पदक, तर सुहास यथीराजने रौप्यपदक मिळवले आहे. यासोबतच भारताने 19 पदकांची कमाई करत क्रीडाविश्‍वात वेगळी मोहोर उमटवली आहे.

स्पर्धेत कृष्णा नागरचने सर्वोत्तम कामगिरी केली आणि 21-17, 16-21 आणि 21-17 असा सामना खेळत मॅच जिंकली. एकूण 43 मिनिटे हा मुकाबला सुरू होता. कृष्णाने सेमीफायनलमध्ये ब्रिटेनच्या क्रिस्टनचा पराभव करत फायनलमध्ये आपली जागा मिळवली. पहिल्या गेममध्ये कृष्णाचा प्रतिस्पर्धी पुढे होता मात्र दुसर्‍या गेममध्ये हॉगकाँच्या चू मन काईची बरोबरी करत कृष्णाने गेम जिंकला. कृष्णाने शेवटपर्यंत हार न मानता तिसर्‍या आणि शेवटच्या गेममध्ये सुवर्ण पदक पटकावले.

पदकांची लयलूट
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यातील पदकांची संख्या आता 19 वर पोहचली आहे. कृष्णा नागर याने भारताला पाचवे सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. भारताच्या खात्यात आता 5 सुवर्ण पदके, 8 रौप्य पदके आणि 6 कांस्य पदके आहेत. पॅरालिम्पिकमध्ये भारताची ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

सुहास यथिराज रौप्य
बॅडमिंटन स्पर्धेत नोएडाच्या सुहास यथिराजने रौप्यपदक पटकावले आहे. सुहासकडून गोल्डन मेडल हुकले असले तरी भारताच्या खात्यात सिल्वर मेडलची भर पडली आहे. रविवारी टोकीयो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकल एसएल 4 क्लास बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये फ्रान्सच्या लुकास मजूरला हरवून सुहासने सिल्वर मेडल आपल्या खात्यात जमा केले. नोएडाचा ख-ड अधिकारी असलेल्या 38 वर्षीय सुहासने गोल्ड मेडल जिंकण्यासाठी फ्रान्सच्या लुकास मजूरसोबत तगडी फाइट केली. ही स्पर्धा पाहणे रोमांचक ठरले. लुकास मजूरला 21-15, 17-21 आणि 15-21 ने हार मानावी लागली आणि सुहासने सिल्वर पदकावर आपले नाव कोरले.

Exit mobile version