• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

जनतेचे खरे कैवारी

Varsha Mehata by Varsha Mehata
November 27, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्रातील राजकारण आणि रस्त्यावरील भांडणे यात सध्या काही फरक राहिलेला नाही. तेच ते आरोप आणि त्याच त्या शिव्या यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक मग्न आहेत. टीव्ही वृत्तवाहिन्याही चोवीस तास तेच दाखवत असल्याने लोकांच्या चर्चेमध्येही हेच विषय येत राहतात. त्यातच राज्यपालपदावर बसलेले एक भाजपचे नेते काही ना काही वाद निर्माण करत आहेत. आपले सरकार सर्वसामान्यांचे असल्याचे मुख्यमंत्री प्रत्येक वाक्यात सांगतात. पण लोकांना मात्र तसा प्रत्यय येत नाही. अतिवृष्टीमुळे अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. ओल्या दुष्काळाची मागणी करीत आहे. विमा कंपन्या भरपाई देत नाहीत. दिलीच तर ती दोन-पाचशे रुपयांच्या वर नसते. पण मुख्यमंत्री या शेतकर्‍यांच्या भेटीला जात नाहीत. ते देवीचा नवस फेडायला आपल्या मंत्र्यांना घेऊन थेट आसामला जातात. या दौर्‍याचा खर्च कोण करतो हे कधीच कोणाला कळत नाही. या पार्श्‍वभूमीवर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची गडचिरोलीत झालेली बैठक आणि तिच्यातील शेती व रोजगारविषयक ठराव महत्वाचे ठरतात. शेकापने आजवर सातत्याने जनतेचे खरे प्रश्‍न सातत्याने मांडले आहेत. कष्टकरी जनतेचा कैवारी हीच या पक्षाची भूमिका राहिली आहे. त्या भूमिकेला जागणारे असेच हे ठराव आहेत. शेतीविषयक ठरावांमध्ये कृषी क्षेत्राचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून शेतमालाला उत्पादनखर्च अधिक नफा मिळालाच पाहिजे यावर भर देण्यात आला आहे. आजवरच्या सरकारांनी शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी उपाय योजले असले तरी शेती धंदा किफायती होण्याकडे पूर्ण दुर्लक्ष कसे झाले ते या ठरावात अचूकपणे अधोरेखित केले आहे. दीर्घकालीन धोरणांसंदर्भातील मागण्यांसोबतच यंदाच्या पावसाळ्यामुळे जे संकट उद्भवले आहे त्याचाही सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे. राज्यातील खरिपाच्या क्षेत्रापैकी तीस टक्के शेतीचे यंदा नुकसान झाले असल्याने एकरी पन्नास हजार रुपये तातडीची मदत आणि नुकसानीची शंभर टक्के भरपाई अशा दोन महत्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. अर्थात देव-धर्म-यात्रा यातच गुंग असलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी शेकापला रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलनेच उभारावी लागतील. बैठकीतील दुसरा महत्वाचा ठराव हा आरक्षणाबाबतचा आहे. मागास जाती व आदिवासी यांना नोकर्‍या व शाळा-कॉलेजातील प्रवेश यामध्ये देण्यात येणार्‍या आरक्षणामुळे पोटात दुखणारा मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. याच समाजाच्या पाठिंब्यावर केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे सध्याचे आरक्षण रद्द करण्याचे बरेच प्रयत्न गेल्या आठ वर्षात झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांना दहा टक्के आरक्षण देण्याबाबत करण्यात आलेली 103वी घटनादुरुस्ती हा त्याचाच मासला होय. वरकरणी गरिबांसाठी म्हणून ही योजना करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात उच्चवर्णीयांना आरक्षण मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. मासिक सुमारे पासष्ट हजार रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबातील व्यक्तीदेखील या आरक्षणाला पात्र ठरू शकणार आहे. यावरून सरकारचा कळवळा किती बनावटी आहे हे लक्षात येते. शेकापने या आरक्षणाला ठाम विरोध केला असून ही दुरुस्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे, हे अत्यंत स्वागतार्ह आहे. याखेरीज आरक्षणाच्या प्रश्‍नातील गुंतागुंत सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची स्पष्ट भूमिका पक्षाने घेतली आहे. तिचेही स्वागत करायला हवे. अशी जनगणना झाल्यास काही प्रभावशाली जातींना आपला टक्का खाली येईल अशी भीती वाटत असल्याने देशातील अनेक पक्ष याबाबत ठोस भूमिका घेण्याला कचरत आहेत. शेकाप अर्थातच त्याला अपवाद आहे. मराठा, धनगर व मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मागणीचा पक्षाने पुनरुच्चार केला आहे. आर्थिक आरक्षणविरोध व जातनिहाय जनगणना या दोन्ही मुद्द्यांवर आज म्हणावी अशी जागृती झालेली दिसत नाही. यापुढच्या काळात शेकापचे कार्यकर्ते आपापल्या भागांमध्ये तसे कार्यक्रम करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. याखेरीज महागाई तसेच महिला सक्षमीकरण याबाबतचे ठरावही महत्वपूर्ण आहेत. विशेषतः मागास समाजातील महिलांना लोकसभा व विधानसभेत आरक्षण देण्याची मागणी हे लावून धरायला हवी अशी आहे. आज अशा महिलांचे प्रमाण नगण्य आहे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

राज्यात गोवरचा प्रादुर्भाव वाढतोय

Next Post

‘शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा’

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
नेरळ: विविध कार्यकारी सेवा संस्थेवरील वर्चस्वासाठी शेकाप सज्ज

‘शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?