• Login
Tuesday, May 30, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • यवतमाळ
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • यवतमाळ
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

‘संतूरचे राजदूत’ हरपले

Varsha Mehata by Varsha Mehata
May 12, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
‘संतूरचे राजदूत’ हरपले
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पं. सुहास व्यास

पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवलं. त्यांच्या अभ्यासपूर्वक साधनेनं आणि तरल अभिव्यक्तीनं हे वाद्य सर्वसामान्यांना परिचित झालं. लोकांना त्यातील गोडवा समजला आणि बघता बघता त्याचा नाद लागला. असं हे आपल्या मनस्वी वादनानं लळा लावलेलं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आता हरपलं आहे. त्यांची उणीव कधीही भरुन येण्याजोगी नाही.
प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनानं झालेलं दु:ख आणि संगीतविश्‍वाची झालेली हानी शब्दांमध्ये वर्णन करता येण्याजोगी नाही. संतूर आणि शिवकुमार हे एक अद्वैत आहे. सतार म्हटलं की रवीशंकर आणि विलायत खान नजरेसमोर येतात, सनई म्हटलं की बिस्मिल्ला खान समोर येतात तसंच संतूर म्हटलं की डोळ्यासमोर येणारा चेहरा पं. शिवकुमार शर्मांचा असतो. या दिग्गजांबरोबर अन्य काही नावंदेखील त्या त्या वाद्यांशी संबंधित असली तरी या लोकांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली ती स्वत:च्या अलौकिक प्रतिभेच्या बळावर… पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवलं. त्यांच्या अभ्यासपूर्वक साधनेनं आणि तरल अभिव्यक्तीनं हे वाद्य सर्वसामान्यांना परिचित झालं. लोकांना त्यातील गोडवा समजला आणि बघता बघता त्याचा नाद लागला. असं हे आपल्या मनस्वी वादनानं लळा लावलेलं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आता हरपलं आहे. त्यांची उणीव कधीही भरुन येण्याजोगी नाही.
आपल्या वडिलांकडून म्हणजेच पं. उमादत्त शर्मा यांच्याकडून शिवजींनी संगीताचे धडे गिरवले. बनारस घराण्याचे पं. उमादत्त शर्मा सगळी वाद्ये वाजवत असत, खेरीज ते उत्तम गात असत. शिवजी त्यांच्याकडूनच तबला शिकले. ते आकाशवाणीवर साथीला असायचे. हिराबाई, भीमसेनजी यांच्यासारख्या दिग्गज गायकांना त्यांनी तबल्याची साथ केली आहे. थोडक्यात सांगायचं तर सुरूवातीला तबल्यावरच त्यांची हुकूमत होती. त्यामुळेच ते उत्तम तबलवादक होणार, अशीच काहींची अटकळ होती. पण वडिलांनीच त्यांच्या हातात संतूर दिलं आणि या वाद्यानं त्यांना वेड लावलं. पुढचा इतिहास आपण सगळेच जाणतो.
1954-55 च्या सुमारास ते मुंबईत आले. ‘झनक झनक पायल बाजे’  या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम संतूर वाजवलं. त्याआधी चित्रपट संगीतात संतूर कधीच वापरलं गेलं नव्हतं. हे काश्मीरचं वाद्य आहे. त्याचं मूळ पर्शियन आहे. तिकडे सुफी संगीतामध्ये ते वापरलं जातं. पण वर उल्लेख केलेल्या चित्रपटाच्या संगीतकारांनी म्हणजेच वसंत देसाई यांनी हे वाद्य ऐकून त्याला आपल्या संगीतात समाविष्ट केलं. ते लोकांना इतकं आवडलं की पुढे ते चित्रपटसंगीताचा एक भाग बनून राहिलं. अर्थात तेव्हाचं संतूर आणि आताचं संतूर यात फरक आहे. कारण कालौघात शिवजींनी या वाद्यात आवश्यक ते बरेच बदल घडवून आणले. शास्त्रीय संगीतामध्ये आठ अंग असतात. त्या अंगामध्ये मिंड हे एक अंग असतं. मिंड सतारीमध्ये येते, सारंगीत येते पण आधी ती संतूरमध्ये नव्हती. त्यामुळे शास्त्रीय संगीतविश्‍वानं हे वाद्य अव्हेरलं होतं. त्याला या संगीतात मान्यता दिली गेली नव्हती. पण ही उणीव भरुन काढण्यासाठी शिवजींनी प्रचंड काम केलं, संशोधन केलं आणि वाद्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच पुढे शास्त्रीय संगीतविश्‍वालाही या वाद्याची दखल घ्यावी लागली.
मी शिवजींना प्रथम 1964 मध्ये पाहिलं. पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात त्यांनी वाजवलं होतं. त्यावेळी ते साधारणत: तिशीचे असतील. तेव्हाच त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं आदबशीर वर्तन आणि अर्थातच बहारदार वादन याची छाप मनावर पडली होती. त्यानंतर सायनला ‘वल्लभ संगीतालया’त मी त्यांचे अनेक कार्यक्रम ऐकले. तो काळ त्यांच्या कारकिर्दीच्या जडणघडणीचा होता. मात्र तेव्हापासूनच त्यांची छबी अत्यंत प्रभावशाली अशीच राहिलेली आहे.
कलाकारानं मौन पाळणं, वाजवी बोलणं अत्यंत महत्त्वाचं असते. ही बाब शिवजींनी कायम पाळली. पाल्हाळ न लावता ते अतिशय मोजकं बोलायचे. इंग्रजी आणि इतिहास या विषयांमध्ये द्विपदवीधर असणार्‍या शिवजींची बुद्धी अतिशय तल्लख होती. ऊर्दू, इंग्रजी, हिंदी भाषेवर त्यांचं कमालीचं प्रभूत्व होतं. या गुणांंनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनोखा उजाळा मिळवून दिला.
1968 मध्ये रविशंकरजींनी 25 ते 30 कलाकारांना घेऊन अमेरिकेचा दौरा आयोजित केला होता. शिवजी, हरीजी, कार्तिक कुमार, रामनारायणजी, अभिषेकीबुवा आदींचा त्यात समावेश होता. शिवजी कायम त्या दौर्‍याची आठवण सांगायचे. त्या दौर्‍यामुळेच खर्‍या अर्थानं ‘संतूरचे राजदूत’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. या दौर्‍यामध्ये त्यांनी संतूरचा प्रसार केला आणि योग्यरित्या जगाला या वाद्याची ओळख घडवली. थोडक्यात परदेशात हे वाद्य लोकप्रिय होण्यास हा दौरा साह्यभूत ठरला आणि तेव्हापासून संतूर वादनाच्या नव्या अध्यायाची सुरूवात झाली.
कलेसाठी कला करणार्‍या कलाकारांमधील एक नाव म्हणजे पं. शिवकुमार शर्मा! कलेवर नितांत प्रेम करणारे ते मनस्वी कलाकार होते. त्यांनी केवळ कार्यक्रम केले  नाहीत तर कायमच कलेप्रतीची वचनबद्धता जपली. पं. रविशंकर, माझे वडील, अभिषेकी, कुमार गंधर्व, भीमसेनजी, किशोरी अशा कलेसाठी जगणार्‍या पिढीतल्या लोकांमधले ते एक होते. नाव, प्रसिद्धी, पैसा ही सगळी ‘बाय प्रॉडक्ट’ असतात. पण मुळात  कलाकारानं कलेसाठी जगावं लागतं. प्रत्येक कार्यक्रमासाठी आपल्यातील शंभर टक्के देण्याची इच्छा आणि क्षमता त्याच्यामध्ये असावी लागते. शिवजींमध्ये ती ठासून भरलेली होती.
एकवेळ अहीर भैरव सारखा राग ठीक आहे पण शुद्ध सारंग, जोग कंस यासारखे राग संतूरवर योग्य त्या प्रभावानिशी वाजवणं अतिशय कठीण आहे. पण शिवजींनी ही कठीण बाबही सहजसाध्य करुन दाखवली. अर्थातच यामध्ये त्यांचा रियाज, चिंतन, मनन आणि स्वत:चे विचार-योगदान या सगळ्याचीच मदत झाली. यात ते कुठेच कमी पडले नाहीत. पाठ केलेलं गाणंं आणि उत्स्फुर्तपणे गायलेलं गाण यात फरक असतो. कुठलीही गोष्ट प्रथम पचवावी लागते, ती मनात उतरावी लागते. त्यातही शास्त्रीय संगीतात प्राविण्य मिळवणं हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. प्रत्येक कार्यक्रम हे कलाकारासाठी एक नवं आव्हान असतं. शिवजींनी हे आव्हान लिलया पेललेलं दिसतं. मी त्यांच्याकडून एक एक राग दोन-तीन वेळाही ऐकला आहे. पण तो ऐकताना कधीच ती आधीची पुनरावृत्ती असल्याचं जाणवलं नाही. खरं सांगायचं तर हेच कलाकाराचं सर्वात मोठं योगदान असतं.
कला सादर करणं हा आत्मानंद असतो, अभिव्यक्ती असते त्याचबरोबर ती रसिकांप्रती असणारी बांधिलकीदेखील असते. शिवजींनी या बांधिलकीचाही नेहमीच आदर केला. तिकीट काढून ऐकायला येणार्‍या प्रेक्षकांना आपल्यातील सर्वोत्तम दिलं पाहिजे, असं ते नेहमी म्हणायचे. आता ही बांधिलकी जपणारी काही मोजकी नावं राहिली आहेत, याचं वाईट वाटतं. आता लोक प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत. पण प्रसिद्धी मिळवण्यासाठी आधी सिद्धी प्राप्त करावी लागते हे त्यांच्या लक्षात येत नाही.
संगीत हा धर्म बनवल्याशिवाय, त्याला शरण गेल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. ही बाब समजली म्हणून शिवजींची पिढी आदर्श ठरली. प्रगतीची अनेक शिखरं पादाक्रांत करुनही त्यांचा रियाज कधी चुकला नाही. एकदा संगीताला वाहून घेतल्यानंतर साधनेसाठी पूर्ण वेळ देताना अवघा दोन-तीन तास झोप घेणारी ही पिढी होती. केवळ दोन-चार राग आले म्हणजे संगीत कळलं असं होत नाही. संगीताची व्यापकता कळण्यासाठी सातत्यानं त्यात रहावं लागतं. मनात सतत गाणं असावं लागतं. ही बाब आता कमी झाली आहे असं म्हणण्यापेक्षा हा मार्ग दाखवणारे लोक आता कमी झाले आहेत असं मला वाटतं. शिवजी हे ही दृष्टी देणार्‍यातील एक होते.
शिवजींनी अनेक शिष्य घडवले. खरं सांगायचं तर शिकवणं हेही एकप्रकारे शिकणंच असतं. त्या अर्थानं त्यांचं शिक्षण, साधना अखेरपर्यंत सुरू होती. याचं एक उदाहरण देतो. आमच्या सतीशनं (पं सतीश व्यास) मेघ रागाची एक सीडी काढली. ती सीडी त्याच्या गुरुजींनी म्हणजेच शिवजींनी ऐकली. त्यांना ती खूप आवडली. पण ती ऐकून त्यांना एक प्रश्‍न पडला तो असा की, मेघ आणि मदमास सारंग यात नेमका काय फरक आहे. हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आमच्या वडिलांना फोन केला आणि या दोन रागांमधला फरक सांगण्याची विनंती केली. अशाप्रकारे न कळणारी, न समजलेली बाब जाणून घेण्याचीही वृत्ती असावी लागते. तीच खर्‍या कलाकाराची वृत्ती असते. मला सगळं माहीत आहे, अशा आविर्भावात राहतो तो कधीच मोठा कलाकार होऊ शकत नाही. ही वृत्ती, बारकावे हेरुन त्याचं मर्म जाणून घेण्याचं कुतूहल, एखाद्याच्या ज्ञानाचा पूर्ण आदर करण्याची वृत्ती असते म्हणूनच शिवजींसारखे कलाकार मोठे होतात.
वागण्या-बोलण्याप्रमाणेच कलाकाराचं मोठेपण त्यांच्या अशा विचारांमध्येही असतं. त्यांच्या शारीरिक उंची आणि देखणेपणाप्रमाणेच वृत्तीतही ही सगळी वैशिष्ट्य सामावली होती. म्हणूनच त्यांच्या मुखावर एक वेगळं तेज आणि बोलकी शांतता दिसायची. अथक साधनेमुळेच काश्मीरमधलं हे देखणेपण समाजानं पाहिलं. ते जगविख्यात झालं. लौकिकार्थानं आता ते हरपलं असलं तरी संतूरचे सूर कानी पडतील तेव्हा तेव्हा ती शांत आणि लोभस मूर्ती नजरेसमोर तरळून जाईल. शिवजींना विनम्र आदरांजली.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperonline marathi newsraigad
Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण
संपादकीय

दिवाळखोरी थांबेना…

May 29, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

स्वर्गसुखाची सत्तरी

May 29, 2023
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
संपादकीय

जलसंकटामुळे देश संघर्षाच्या उंबरठ्यावर

May 29, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

मोदींची वास्तुशांत

May 29, 2023
पाच दिवस भीतीच्या छायेखाली तळघरात; नेत्रन धुरीची माहिती
संपादकीय

मोदींच्या नऊ वर्षात नाकी नऊ

May 25, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

बहिष्कार रास्तच

May 25, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • May 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • January 1970
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • यवतमाळ
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?