• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चणेरा फुलला हळदीकुंकू समारंभाने

Santosh Raul by Santosh Raul
January 31, 2024
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड, रोहा
0 0
0
चणेरा फुलला हळदीकुंकू समारंभाने
0
SHARES
252
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हजारो महिलांची उपस्थिती

| अलिबाग/चणेरा | प्रतिनिधी |

पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण, संस्कृतीचे संवर्धन, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे हा उद्देश समोर ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून कृषीवलने हळदीकुंकू समारंभाची परंपरा जपली आहे. रोहा तालुक्यातील महिला या नाविन्यपूर्ण उपक्रमातून एकत्र याव्यात यासाठी कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाराने पहिल्यांदाच चणेरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हळदीकुंकू समारंभाचे आयोजन बुधवारी (दि.31) करण्यात आले. या समारंभाने चणेरा गाव फुलून गेला. महिलांचे जीवन कायम व्यस्त असते. अशा कार्यक्रमांमधूनच त्यांच्या भेटीगाठी होत असतात. हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच ठरला.

पारंपरिक मराठमोळा पेहराव करीत दुपारी साडेतीन वाजल्यापासून महिला कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊ लागल्या. पहिल्यांदाच रोहा तालुक्यात घेतलेल्या या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी महिलांनी बघता बघता अलोट गर्दी केली. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून आनंदाचं वाण लुटले. दरम्यान, चित्रलेखा पाटील यांच्यासह रोहा तालुक्यातील असंख्य शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित असंख्य महिलांचे औक्षण केले. यावेळी एकमेकींना हळदीकुंकू लावून विचारांचे आदानप्रदान करण्यात आले. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकमेकींना दिला. हळदीकुंकू समारंभाबरोबरच उखाणे स्पर्धा व इतर मनोरंजनाचे खेळ यानिमित्ताने घेण्यात आले. वयोवृद्ध महिलांनीही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. या समारंभामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करुन एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण होते, ताणतणाव कमी होऊन मुक्तपणे मनसोक्त गप्पा मारतात. यासाठी अशा कार्यक्रमांची खरोखरच अत्यंत गरज आहे. पहिल्यांदाच अशा सार्वजनिक कार्यक्रमाला गावातील महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

यावेळी कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील, कृषीवल विभागाचे रूपेश पाटील, जाहिरात व्यवस्थापक हर्षा नाईक, दर्शना पाटील, भैरवी जाधव, समृद्धी म्हात्रे, सचिन गुप्ता, सुरेंद्र वेळे, संतोष राऊळ, रोहा महिला आघाडी प्रमुख कांचन माळी, राजेश्री जोशी, दीपा ठाकूर, संजीवनी चाळके, राजेश्री दाभाडे, राजेश्री शाबासकर, सुषमा दिवकर, रिना गिजे, आर्या शिंगरे, नंदिनी यादव, शुभ्रा आडाव, अंजली ठाकूर, शलाका विचारे, उज्वला थोरवे, अपर्णा मढवी, अरुणा तांबडे, सागरिका मळेकर, अश्विनी मोरे, काशीबाई म्हात्रे, कविता भोईर, रिना भायतांडेल, मयुरी कडव यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेश मढवी, रोहा तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शंकरराव म्हसकर, मजदूर फेडरेशनचे चेअरमन हेमंत ठाकूर, जिल्हा परिषद माजी सदस्य नंदकुमार म्हात्रे, गोपीनाथ गंभे, संदेश विचारे, जितेंद्र जोशी, अमोल शिंगरे, विकास भायतांडेल, नंदेश यादव, काशीनाथ भोईर, लियाकत खोत, दत्ता पोवळे, राज जोशी, हिराजी कांडणेकर, शंकर दिवकर, दीपक गिजे, राम गिजे, संतोष दिवकर, राजेंद्र मळेकर, परेश म्हात्रे, महादेव शाबासकर, पांडुरंग तांबडे, अभिजीत शिंगरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, रोहा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अनोख्या स्पर्धेने रंगत
हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त खास महिलांसाठी उखाणा, मोठी टिकली, मोठा गजरा आणि जास्त हिरव्या बांगड्यांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत असंख्य महिलांनी सहभाग घेतला. प्रत्येकीने आपापल्या परीने उखाणे सादर केले. तर काहींनी हिरव्या बांगड्या, गजरा घातल्याचे दिसून आले. कृषीवल टीमच्या हर्षा पाटील, भैरवी जाधव यांनी त्यांची निवड केली. चंद्रभागा साळवी, भायदेकाकी आदी महिला विजेत्या ठरल्या. त्यांचा कलाकारांच्या हस्ते पैठणी आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
खालूबाजा बँड पथकाने स्वागत
हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवर कलाकारांचे आगमन होताच, त्यांचे खालूबाजा आणि बँड पथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले. त्यामध्ये न्हावे येथील प्रल्हाद कोटकर यांनी सहभाग घेतला होता. चणेरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील आरएसपी पथकाने मान्यवरांना मानवंदना देत स्वागत केले. यावेळी पारंपरिक लोकगीत, धावऱ्या नाचाबरोबर आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. हा आगळावेगळा स्वागत सोहळा पाहून मान्यवर भारावून गेले.
सिनेतारकांना प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद
सोनी मराठी वाहिनीवरील वेगवेगळ्या मालिकेतील सिनेतारका या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखल झाल्या होत्या. नेहमी टीव्हीद्वारे बघता येणाऱ्या अभिनेत्रींना पाहण्यासाठी, त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी एक वेगळा आनंद लुटला. निवेदिता माझी ताई या मालिकेतील निवेदिता तथा अभिनेत्री एतशा सांझगिरी आणि अभिनेता यशेेोधन म्हणजे अशोक फळदेसाई आणि छोट्या बयोची मोठी स्वप्नं या मालिकेतील अभिनेत्री बयो म्हणजे विजया बाबर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. यावेळी सिनेतारकांसोबत सेल्फी काढण्याची हौस अनेक महिलांनी पूर्ण केली.
समारंभातून महिला सक्षमीकरणाचा ध्यास- चित्रलेखा पाटील
कृषीवल वृत्तपत्राने 75 हून अधिक वर्षे कष्टकरी, कामगार, शेतकरी, गोरगरीब, महिलांच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला आहे. ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेत 28 वर्षांपूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील यांनी कृषीवल हळदीकुंकू समारंभाचा खऱ्या अर्थाने पाया रोवला. अलिबागमध्ये हजार महिलांपासून सुरू झालेल्या या समारंभाची उंची दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला महिलावर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा स्वरूप वाढत असल्याने आनंद आहे. कृषीवल वृतपत्र चळवळीचे व पुरोगामी विचारांचे आहे. माणूस मानणारा वृत्तपत्र आहे. स्त्रीशक्तीचे सन्मान करणारे, सर्व स्तरातील महिलांना मान देणारे वृतपत्र आहे, असे प्रतिपादन कृषीवल संचालिका चित्रलेखा पाटील यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या चार-पाच वर्षात हळदीकुंकवाची उंची वाढली असून, त्याचे स्वरुप भव्य झाले आहे. यामध्ये सोनी मराठी, कलर्स मराठी, झी मराठीचा मोठा वाटा आहे. कारण, वेगवेगळ्या मालिकेतील कलाकारांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमाला रंगत आणली. येथे उपस्थित महिलांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम केले. सोनी मराठीचे कलाकार ग्रामीण भागात आवर्जून येतात. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. रोहा तालुक्यातील महिलांसाठी चणेरा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यकमाला अपेक्षेपेक्षाही प्रतिसाद मिळाला. याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे.

यावेळी चित्रलेखा पाटील यांनी रोहा तालुक्यातील शेकाप कार्यकर्ते आणि उपस्थित भगिनींचे विशेष कौतुक केले. दरम्यान, उपस्थित कार्यकर्त्यांमधून ‌‘शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, लाल बावटे की जय’ अशा गगनचुंबी घोषणा देण्यात आल्या. कोणताही कार्यक्रम एका व्यक्तीमुळे होत नसून, त्यासाठी योग्य नियोजन लागते, आणि त्यासाठी रोहा तालुक्यातील शेकाप कार्यकर्ते, कृषीवल टीम आणि ज्या शाळेच्या पटांगणावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या न्यू इंग्लिश स्कूल, चणेराच्या व्यवस्थापनाचेही चित्रलेखा पाटील यांनी आभार मानले.

Related

Tags: alibaghaldikunkuindiaindia newskrushival haldikunkukrushival haldikunku 2024krushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कर्जत बार असोशिएशनतर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

Next Post

उद्धव ठाकरे दोन दिवस रायगडात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला
sliderhome

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला

February 14, 2026
Next Post

उद्धव ठाकरे दोन दिवस रायगडात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?