| खोपोली | प्रतिनिधी |
67 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 2023-24 आयोजन मध्यप्रदेश येथील विदिशा जिल्ह्यातील शमशाबाद तेथे 3 ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान पार पडले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघात राज्यस्तरीय स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील 46 किलो वजनी गटात प्रथम पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी क्षितिजा जगदिश मरागजे हिची निवड झाली होती.
या राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर क्षितिजाने राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक जिंकून महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्याचे नावलौकिकात भर टाकली आहे क्षितिजा ही खोपोली तेथील कारमेल कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थीनी असून ती कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे कुस्ती प्रशिक्षक राजराम कुंभार,राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे,दिवेश पालांडे,विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला क्रीडा शिक्षक जगदिश मरागजे,जयश्री नेमाने,समीर शिंदे यांचे ही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.