। खोपोली । वार्ताहर ।
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024-25 परभणी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबई विभागाचे नेतृत्व करताना रायगडच्या क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने सलग तिसर्यांदा सुवर्ण पदक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाची महिला मल्ल असून राजाराम कुंभार, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, दिवेश पालांडे, विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या आठव्या वर्षापासून कुस्तीचा सराव करत आहे. ती खोपोली कारमेल कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिला क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे, समीर शिंदे, जयश्री नेमाने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
क्षितिजाची कुस्तीत ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक
