। खोपोली । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग इंडिया असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यामानाने अल्लापूजा, केरळ येथे सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर,मास्टर मुले व मुली आणि पुरुष व महिला यामध्ये 53किलो वजनी गटात कुणाल सुभाष पिंगळे यांनी भारतामध्ये वैयक्तिकमध्ये रौप्यपदक मिळवून घोडीवली गावाचे नाव रोशन केले आहे.
महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभादेवी मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्रातून असंख्य व्यायामपट्टूंनी सहभाग दर्शवत आपआपली खेळी दाखवली. या स्पर्धेत खालापूर तालुक्यातील खेळाडूंनी नैपुण्य दाखवले. घोडीवली गावातील कुणाल सुभाष पिंगळे 53 किलो वजनी गटात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सुर्वण पदकाचा मानकरी ठरला, तर नॅशनल स्पर्धेत निवड होत पुन्हा एकदा रौप्य पदकाचा मानकरी ठरला असून सर्वच ठिकाणावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.







