केमिकलमुळेे कुंडलिका झाली प्रदूषित

दुर्गंधीमुळे नागरीकांमध्ये संताप
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रात अनेक केमिकल्सयुक्त कारखाने आहेत. मात्र त्यातील काही कारखाने केमिकल मिश्रीत सांडपाणी थेट कुंडलिका नदी पात्रात सोडत असल्याने कुंडलिका नदी पूर्णतः प्रदूषित झाल्याने तसेच दूषित पाणी नदीपात्रात गेल्याने दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांचा संताप व्यक्त करीत आहेत.
सदरचे कारखानदार यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळांनी अनेकदा धाडी टाकल्या आहेत. तसेच पाहणी देखील केली, परंतु याबाबत कोणतीच ठोस भूमिका अथवा त्यावर उपायुक्त अशी उपाययोजना केली जात नाही. केमिकल मिश्रीत पाण्याचा त्रास नाहक नदीकाठी वसलेल्या नागरिकांना होत आहे. पाणी प्रदूषित होत असल्याने या पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत.

Exit mobile version