संदीप पाटील यांच्याकडून कौतुक
| अलिबाग | प्रतिनिधी |
कोकण एज्युकेशन सोसायटी आणि जीवनदीप प्रकाशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला, निबंध लेखन, गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गायन स्पर्धेत कुर्डूस येथील को.ए.सो. प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींनी बाजी मारली. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
जान्हवी पाटील हीने प्रथम क्रमांक तर हंसिका पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळविला. शाळेचे चेअरमन ॲड.आस्वाद पाटील, शाळा समितीचे सदस्य रामचंद्र कर्वे, संदिप पाटील, सुलोचना पिंगळे, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुंभार, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना राजाराम जोशी, धर्मेंद्र फुलपगारे, भानुदास गावित, प्रतिभा केणी, शलाका पाटील, योजना पाटील मार्गदर्शन लाभले असून शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेदेखील चांगल्या पध्दतीने सहकार्य लाभले.