कुरुळ हायस्कूलचे उद्या स्नेहसंमेलन

| अलिबाग | प्रतिनिधी |

कुरुळ येथील सुधागड शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी (दि.27) कुरुळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध वेशभूषा, वर्ग सजावट, प्रदर्शन मांडणी, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मंगळवारी सकाळी 10 वाजता रंगावली आणि हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच सृजन, बालसृजन वार्षिक हस्तलिखितांचे प्रकाशन, वार्षिक पारितोषिक वितरण जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्श पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 10 ते 12 या कालावधीत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम गोष्टरंग तर दुपारी अल्पोपहार असे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती शाळा व्यवस्थापनाच्यावतीने देण्यात आली.

Exit mobile version