। अलिबाग । वार्ताहर ।
नामदेव नगर सांबरी येथील सामाजिक कार्यकर्ते स्व. सिताराम शेठ यांच्या पत्नी कुसूम पाटील यांचे वयाच्या 95 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. कुसूम पाटील यांची जनमानसात एक चांगली प्रतिमा होती. त्या नेहमी गोरगरीब, अडल्या नडल्यांना मदत करीत असत. सर्पदंश, विंचूदंश यांवर त्या औषध देत असत. त्यांच्या पश्चात सहा मुलगे, एक मुलगी, सूना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव सुहास, आनंद हे उच्च पदस्थ सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहेत. त्यांचा दशक्रिया विधी 29 तारखेस असल्याचे पाटील कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे
कुसूम पाटील यांचे निधन
