तेजस्विनी फाउंडेशनच्या वतीने कुसुंबळे आदिवासीवाडी सांस्कृतिक कार्यक्रम

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन कुसुंबळे अलिबाग तसेच नवयुवक माघी गणेशोत्सव मंडळ कुसुंबळे आदिवासीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माघी गणेशोत्सवा निमित्त कुसुंबळे आदिवासीवाडी येथे महिलांसाठी विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी वाडी येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन तेजस्विनी फाउंडेशनच्या संस्थापिका जिविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस्विनी फाउंडेशनचे विश्‍वस्त धीरज पाटील, चिराग पाटील, विजय पाटील, राखी पाटील, मिनाक्षी केणी यांनी केले होते.

कार्यक्रमासाठी तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका जिविता पाटील, अरुण पाटील, नंदू घरत, प्रेमलता खरसंबळे, मंदाकिनी पाटील, सुनील पाटील, देवेंद्र केळुस्कर इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावागावांतील महिला संकुचित विचारांना मागे टाकून पुढे येत आहेत व एकमेकींना प्रोत्साहित करीत घर, संसार, जबाबदारी यातून बाहेर पडून महिलांनी केव्हातरी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे व काही क्षण स्वतःसाठी आनंद मिळविण्यासाठी जगणं आवश्यक आहे असे मत पाटील यानी व्यक्त केले.

यावेळी लायन्स क्लब अलिबाग फेस्टीवलतर्फे आयोजित शरीरसोष्ठव स्पर्धा 2023 मध्ये पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला चिराग पाटील याचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धीरज अर्जुन पाटील याचे सहकार्य लाभले. तर तेजस्विनी फाऊंडेशनचे अध्यक्ष यश पाटील, उपाध्यक्षा भाग्यश्री तांडेल, सचिव रमाकांत जैतू, अ‍ॅड. विकास पाटील, अ‍ॅड. अमर घरत, दिपाली कुंभार, डॉ. रेखा म्हात्रे, कौतुक निळकर, दिलीप मोकल, निलेश थळे, महेश पाटील, अनिल पाटील, गौरव पाटील, अनंता पाटील, निता प्रवीण पाटील, नयना पाटील, इ.चे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र केळुस्कर तर आभार प्रदर्शन धीरज पाटील यांनी केले.

Exit mobile version