। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
प्रशांत महासागरात यंदाच्या वर्षअखेरीस मला निनाम सक्रिय होण्याची 60 टक्के शक्यता असून, त्यामुळे उत्तर भारतात यंदाचा हिवाळा नेहमीपेक्षा कडक असू शकतो, असा अंदाज आहे. जागतिक हवामान संस्थेच्या दीर्घकालीन अंदाज केंद्राने हा अंदाज वर्तविला आहे. प्रशांत महासागरात सध्या न्यूट्रल स्थिती असून सध्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत या स्थितीत बदल होऊ मला निनाम विकसित होण्याची 55 टक्के शक्यता आहे. त्यानंतर यंदाच्या ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यात थोडी वाढ होऊन ही टक्केवारी 60 वर पोचू शकते. मॉन्सूनवर विपरीत परिणाम करणारी एल निनोची अवस्था पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नगण्य आहे.
ला निनाच्या अवस्थेत मध्य व पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते. त्यामुळे उष्णकटिबंधीय क्षेत्रातील वातावरणातही बदल होतो. ला निना सक्रिय झाल्यानंतर भारतात मॉन्सूनची तीव्रता वाढून पावसाचे प्रमाण वाढते. पाऊस दीर्घकाळपर्यंत पडू शकतो. त्याचप्रमाणे, विशेषत: उत्तर भारतात हिवाळा नेहमीपेक्षा अधिक कडक असतो. मात्र, भारतीय हवामान विभागाने अद्याप त्याची पुष्टी केली नाही.ला निनाचे परिणाम त्याची तीव्रता, कालावधी, सक्रिय होण्याचा वर्षातील काळ आणि हवामानाशी निगडित अन्य घटकांशी परस्परक्रिया आदींवर अवलंबून असतात. सामान्यत: ला निनामुळे हवामानावर एल निनोच्या विरुद्ध परिणाम होतात. एल निनो ही अवस्था ला निनोच्या उलट असून यात प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. मात्र, अलीकडच्या काळात मानवी हस्तक्षेपामुळे होणार्या हवामान बदलाची किनारही एल निनो, ला निना विकसित होण्याला आहे. हवामान बदलामुळे जागतिक तापमानवाढ, हवामानाच्या टोकाच्या घटना आदींचा सामना करावा लागतो, असे जागतिक हवामान संस्थेने म्हटले आहे.