| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालत असताना अचानक चक्कर आल्याने खाली पडलेल्या 36 वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताचे नाव माफुया हुसेन शेख सिराजुद्दीन (36) असे असून, तो मूळचा बशीर येथील रहिवासी होता. तो पनवेल परिसरात मजुरीचे काम करीत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माफुया हुसेन हा चालत जात असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या मदतीने पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
चक्कर येऊन मजुराचा मृत्यू
