आषाढीला लाखो भक्तांचा एसटीतून प्रवास

महामंडळाला मिळाले 28.92 कोटींचे उत्‍पन्न

| रायगड | प्रतिनिधी |

यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एसटीने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान सुमारे 5 हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बसद्वारे 19 हजार 186 फेऱ्यांमधून 9 लाख 53 हजार भाविक – प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून 28 कोटी 92 लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.

5 हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया 4 तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगण सोहळयासाठी एसटीकडून 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या

Exit mobile version