घरफोडीत लाखोंचा ऐवज चोरीला

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा येथील पेंधर गावात सचिन कसबे कुटुंबासह रात्रीच्या वेळी घरामध्ये झोपी गेले होते. पहाटेच्या सुमारास कसबे कुटुंबिय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी किचनचे ग्रील उचकटून त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्यांनी कसबे यांच्या घरातील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल 6 लाख 90 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कसबे यांना जाग आल्यानंतर त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

Exit mobile version