घरफोडीत लाखोंचे दागिने लंपास

। पनवेल । वार्ताहर ।
एका राहत्या घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून कपाटामधील लाखो रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना पनवेल जवळील वडघर येथे घडली आहे. अतुल प्रकाशे (वय 32) हौशा रेसिडेन्सी, वडघर यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश करून कपाटामधील लाखो रुपये किमतीचे दागिने त्यामध्ये सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, नथ, झुमके, चांदीचा छल्ला असा मिळून 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version