इक्वेडोरमध्ये भूस्खलनात 22 जणांचा मृत्यू

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इक्वेडोरमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे येथील घरे भूस्खलनाने उद्ध्वस्त झाले आहेत.तर 32 लोक जखमी झाले आहेत.
क्विटोत जवळपास 24 तास पाऊस पडला आहे. त्यानंतर हाहाकार माजला आहे.

बचाव टीमसह स्थानिकांनी नागरिकांना अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यात आले आहे. अचानक खिडक्या आणि दरवाजांमधून घरात पाणी भरु लागले, असे आपत्तीचे वर्णन महिलेने केले. क्विटोचे महापौर सँटिगो गॉरडेरास म्हणाले, अतिवृष्टीमुळे चिखल जमा झाले होते. त्यानंतर भूस्खलन झाले. टॅक्सीसह अनेक वाहने चिखलाच्या खाली दबले गेले होते. मदत पथक आणि स्थानिक लोकांनी एकत्र येत चिखल बाजूला सारुन अनेकांना मदत केली आहे.

Exit mobile version