किरकोळ भाजीविक्रेत्यांचे पावसामुळे मोठे नुकसान

। चौक । वार्ताहर ।
पुन्हा सुरू झालेल्या पावसाने चौक बाजारपेठ मध्ये गावठी भाजीपाला विकण्यास बसणार्‍यांचे मोठे नुकसान होत आहे,याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था काहीच करत नसल्याचे दिसून आले आहे.चौक या बाजारपेठ मध्ये अनेक प्रकारच्या गावठी भाज्या, रान भाज्यांचा व औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या विक्रीस येत असतात,या बाजारपेठ मध्ये परिसरातील 35 ते 40 गावातील लोक खरेदीसाठी येतात,त्याचप्रमाणे या परिसरात मुंबई येथील धनिकांचे फार्महाऊस असून तेही या भाज्या खरेदी करण्यासाठी येतात.परंतु हे विक्रेते गटाराच्या फुटपाथवर उघड्यावर बसतात,पाऊस आल्यावर भाजीचे टोपले ठेऊन कुणाच्या तरी दुकानाच्या आडोशाला उभे रहातात,सतत टोपली उचलणे शक्य नाही. यात ही भाजी पुन्हा भिजल्याने तिचे नुकसान होत असते.

Exit mobile version