शिवाजी पार्क मैदानावर लता मंगेशकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार

| मुंबई | प्रतिनिधी |
जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं आज सकाळ ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झाले. मागच्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून श्रद्धांजली व्यक्त केली जाते आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजता शिवाजी पार्क येथील मैदानावर लता दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Exit mobile version