आ. जयंत पाटील यांच्या हस्ते स्व. प्रवीण पाटील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत नेरळ आणि कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या विविध विकास कामांचेही उदघाटन
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत नेरळ आणि कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामे शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकाराने झाली आहेत. या विकासकामांचा लोकार्पण सोहळा आणि नव्याने मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन गुरुवार दि. 16 जून रोजी आमदार तथा शेकाप चिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केलेली कामे दर्जेदार झाली असून या कामांमध्ये आपण समाधानी असून ठेकेदार वर्गाचे देखील कौतुक यावेळी आ. जयंत पाटील यांनी केले.

स्व. प्रवीण पाटील यांनी कोरोना पूर्व काळात नेरळ प्राधिकरणाकडून अनेक कामे मंजूर करून आणली होती. परंतु कोरोनामध्ये प्रवीण पाटील यांचे निधन झाल्याने ही कामे अपूर्ण अवस्थेत होती. त्यात नेरळ मोहाचीवाडी पूल, नेरळ मधील अंतर्गत रस्ते, हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहाच्या वरील मजल्यावरील वाढीव सभागृह ही सर्व कामे पूर्ण झाली असून या कामांचा लोकार्पण सोहळा आ. जयंत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला. दुपारी 12 वाजता हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह बोपेले-कोल्हारे, नेरळ येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. जयंत पाटील यांचे आगरी समाज संघटना कर्जत तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आगरी समाजाच्या वतीने सभागृहाच्या शुशोभीकरणासाठी निधी मंजूर करावा यासाठी निवेदन दिले. आ. जयंत पाटील यांनी तात्काळ सभागृह सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी आमदार धर्यशील पाटील, निलिमाताई पाटील, आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष शिवाजी खारीक, विलास थोरवे, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, श्रीराम राणे, अरुण कराळे, संतोष जंगम, नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच उषा पारधी, उप सरपंच मंगेश म्हसकर, वसंत कोळंबे, संतोष जामघरे, सुनील रसाळ, राजेंद्र विरले , जिल्हा परिषद सिमा सदस्या पेमारे, मानसी पाटील, गजानन पेमारे आदी उपस्थित होते.

कर्जत तालुक्यातील आगरी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आगरी समाजाची एकजूट ठेवली आहे. ती बाब कौतुकास्पद आहे. यात राजकारण आणू नका, राजकारणामुळे समाजामध्ये फूट पडते, आगरी समाज संघटनेने एवढे मोठे सामाजिक सभागृह उभारले आहे. त्यांचे मनापासून कौतुक, मी आमदार निधीतून आगरी समाज सभागृह शुशोभीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध देणार आहे.

-आ. जयंत पाटील,
Exit mobile version