अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून व येणार्या दिवाळी सणाच्या अनुषंगाने अलिबाग नगर परिषद मार्फत अलिबाग शहर उपजीविका केंद्राचे स्थलांतर जुन्या नगर परिषदच्या जवळ नुतनीकरण करुन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. 9) करणायात आले. अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील हस्ते फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करुन करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, मुख्याधिकारी अंगाई साळुंंखे, साधना पाटील, सभापती अजय झुंझाराव, राकेश चौलकर अश्विनी पाटील, राजश्री पेरेकर, नगरसेवक अनिल चोपडा, अॅड. गौतम पाटील, नगरसेविका सुरक्षा शहा, वृषाली ठोसर, सुषमा पाटील, नईमा सय्यद, प्रिया वेलकर, शहर महीला आघाडी प्रमुख पल्लवी आठवले उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी अंगाई साळुंंखे यांनी नगर परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व म्हणाले की उपजीविका केंद्रामुळे अनेक महीलांना स्वतःच्या पायावर उभराहण्यात मदत होईल. तसेच यावेळी सर्व मान्यवरांनी बचत गट महिलांच्या दुकानांची पाहणी व खरेदी केली.सूत्रसंचालन प्राची पाटील यांनी केले.