नऊ उपग्रहांचे इस्त्रोतर्फे प्रक्षेपण

। श्रीहरीकोटा । वृत्तसंस्था ।
भारतीय आंतराळ संशोधन संस्था इस्रोने शनिवारी( 26 नोव्हेंबर )9 सॅटेलाईट्स लाँच केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये भूतानसाठी खास रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट लाँच करण्यात आलेला आहे. सकाळी 11.56 वाजता श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरवरील लाँचपॅडवरुन ओशनसॅट-3 (जलशरपडरीं) हा सॅटेलाईट लाँच करण्यात आला. ही लाँचिंग पीएसएलव्ही-एक्सएल या रॉकेटवरुन करण्यात आलेली आहे. यासोबतच भूतानसाठी एक विशेष रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट आणि सोबत आठ नॅनो उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

भूतानसॅट हा भारत आणि भूतानचा एकत्रित उपग्रह आहे. एका तंत्रज्ञानाशी संबंधित हा सॅटेलाईट आहे. भारताने यासाठी टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर केली आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग कॅमेरा लागला आहे. त्यामुळे पृष्ठभागाची माहिती मिळवता येईल. रेल्वे ट्रॅक बनवणे, ब्रिज बनवणे यासंबंधी कामं या उपग्रहाद्वारे साध्य होणार आहेत. शिवाय यामध्ये मल्टी स्पेक्ट्रल कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. त्यामुळे साध्या फोटोंसह वेगवेगळ्या प्रकाश तरंगांच्या आधारे फोटो निघणार आहेत.

Exit mobile version