। पोयनाड । वार्ताहर ।
पोयनाड येथील झुंझार युवक मंडळाने आयोजित केलेल्या सब-जुइअर 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट लीग स्पर्धेला 14 एप्रिलपासून रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
झुंझार युवक मंडळाच्या शष्टब्दीपूर्ती वर्षाच्या निमित्ताने जिल्ह्यातील युवा व होतकरू सबजुनिअर म्हणजेच 12 वर्षांखालील खेळांडूनसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकदिवसीय 40 षटकांचा फॉरमॅट स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. याआधी मंडळाने 14 वर्षांखालील जुनिअर खेळाडूंसाठीसुद्धा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.
सबजुनिअर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना पनवेल क्रिकेट स्पिर्ट्स अकॅडमी विरुद्ध पँथर क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल या दोन संघांमध्ये खेळला गेला. हा सामना पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीने 95 धावांनी जिंकला.
स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, सदस्य संदीप जोशी, सागर कांबळे, झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, खजिनदार दीपक साळवी, सदस्य अजय टेमकर, सुजित साळवी, ग्रामपंचायत सदस्य किशोर जैन, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य नारायण म्हात्रे, अॅड. पंकज पंडित, संदीप सावंत, जयवंत पाटील यांच्यासह पोयनाड विभागातील क्रिकेट रसिक उपस्थित होते.
पोयनाड येथे सब-जुनिअर क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
