| रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा येथील डॉ. पाटील हॉस्पिटल रसायनी येथे कामगार आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली आहे. डॉ. पाटील हॉस्पिटल रसायनी हे सुसज्ज असे हॉस्पिटल असून, येथे सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात तसेच, येथे सर्व प्रकारचे ऑपरेशनही केले जातात. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कंपनीकडून कॅशलेस मेडिक्लेमची सुविधादेखील उपलब्ध आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. जितेंद्र पाटील यांनी दिली.