| तळा | प्रतिनिधी |
जीवनात प्रत्येकाला सुरक्षितता मिळण्यासाठी कायदे करण्यात आलेले आहेत. तेव्हा स्वतः उत्तम जगा आणि दुसर्याला सुखाने जगू द्या. कोणावरही अन्याय करू नका, असे महत्त्वपूर्ण विचार दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माणगाव जी.सी. फुलझलके यांनी व्यक्त केले. ते तळा तालुका विधीसेवा प्राधिकरण आयोजित कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर विधी सेवा प्राधिकरण समिती सदस्य अॅड. निलेश रातवाडकर, कौस्तुभ धामणकर, रोशन पांढरे, अॅड. वाय.एम. साधू, चेतन चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, हायस्कूल चेअरमन महेंद्र कजबजे उपस्थित होते.
आपण स्वतः उत्तम जगा आणि दुसर्याला सुखाने जगू द्या जेणेकरून आपल्या हातून कोणावरही अन्याय होणार नाही. या घटनेने आपल्याला काही अधिकार दिले आहेत. त्यांचे संरक्षण करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ते करा, असे महत्त्वपूर्ण विचार फुलेझलके यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. साधू यांनी केले. अॅड. रोशन पांढरे, कौस्तुभ धामणकर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एन.सी. पाटील यांनी तर विधी सेवा प्राधिकरण समितीतर्फे निलेश रातवाडकर यांनी आभार मानले. याप्रसंगी दिवाणी न्यायालयाचे कर्मचारीरुंद, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.