। मुंबई । वृत्तसंस्था ।
अंधेरी पूर्व निवडणुकीत ऋतुजा लटके यांचाच विजय जवळपास निश्चित झालाय. ऋतुजा लटके यांना मतमोजणीच्या तेराव्या फेरी अंती 48 हजार 15 मतं मिळाली आहेत.
पक्षफुटीनंतर शिवसेनेचा हा सर्वात मोठा विजय आहे. शिवसेनेला उभारी देणारा हा विजय आहे. या विजयामुळे राज्यातील पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटात नक्कीच चैतन्य संचारलं आहे. शिवसेनेचे बडे नेते अनिल परब यांनी ऋतुजा लटके यांना बहुमताने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत.