। मुंबई । वृत्तसंस्था ।
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे. तिसऱ्या फेरीतही लटके आघाडीवर आहेत.
दहाव्या फेरीतील मतमोजणीनंतरही ऋतुजा लटकेची आघाडी कायम असून, आता त्या विजयाच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे दिसत आहे. या फेरीतील मतमोजणीनंतर लटके यांना ३७ हजार ४६९ मतं मिळाली आहेत. तर नोटाने दुसरे स्थान कायम राखत ७ हजार ५५६ मतं मिळवली आहेत. बाळा नाडर ९७५ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहे.