| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल नागाव माळी समाज तर्फे मंदार वर्तक यांचा माळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक, संचालक मंडळ नागाव हायस्कूल अध्यक्ष एम एन पाटील, सदस्य नागाव पंचायत सुरेंद्र नागलेकर, नागाव चौल शेकाप विभागीय चिटणीस सचिन राऊळ, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक म्हात्रे, व्यावसायिक मनोहर ठाकूर, माझी सदस्य संदेश नाईक आणि माळी समाज नागाव मधील ज्येष्ठ आणि तरुण वर्ग असे सगळेच शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
तसेच यावेळी मंगेश ठाकूर ह्यांची पण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अकाऊंट डिपार्टमेंट हेड म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.
या वेळी सुरेंद्र नगलेकर, एम एन पाटील, द्वारकानाथ नाईक आणि सचिन राऊळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.