अँड. मंगेश नेने यांना आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित


| खरोशी | वार्ताहर |

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार (दि. 7) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश विश्वनाथ नेने यांच्या संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. नेने यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.|

Exit mobile version