| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सुगवे या गावात जन्मलेले लक्ष्मण बारकू पेमारे यांना शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुक्यात संस्थापक समजले जात होते. लाल बावट्याचे निष्ठावंत पाईक अशी त्यांची ख्याती होती.
खांडस जिल्हा परिषद गटा मधून तब्बल तीनवेळा रायगड जिल्हा परिषदेवर पेमारे निवडून गेले होते.1978मध्ये त्यांना कर्जत पंचायत समितीचे सभापती करण्यात आले.त्याआधी सुगवे विविध विकास कार्यकारी सहकारी संस्था,खरेदी विक्री संघ आणि कशेळेे भात गिरणीवर संचालक म्हणून ते सातत्याने निवडून येत होते.त्यात विविध विकास कार्यकारी सहकारी संस्थेवर 20वर्षे तर भात गिरणी वर 10वर्षे संचालक राहिले होते.कर्जत तालुक्यातून रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून ते निवडून गेले होते.कर्जत पंचायत समितीवर सभापती म्हणून काम करीत असताना त्यांना रायगड जिल्हा परिषदेमध्ये जबाबदारी देण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पाटील यांनी घेतला.
1979ध्ये लक्ष्मण बारकू पेमारे हे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनले.त्यात आरोग्य आणि अर्थ समितीचे सभापती बनलेले पेमारे यांना प्रवासाच्या दृष्टीने सुगवे हे अंतर लांबचे वाटत होते.त्यामुळे ते 1980 मध्ये नेरळ गावात राहायला गेले होते.त्यानंतर नेरळ गावातील हेटकर आळी येथील घरातून अलिबाग अशी ये जा करू लागले होते.त्यावेळी राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.त्यामुळे प्रभाकर पाटील हे अध्यक्ष म्हणून आणि लक्ष्मण पेमारे हे उपाध्यक्ष म्हणून तब्बल 12वर्षे सत्तेवर कायम होते.काही वर्षांपूर्वी लक्ष्मण पेमारे यांची पंच्याहत्तरी मोठ्या जल्लोषात त्यांच्या कुटुंबाने साजरी केली होती. मागील काही वर्षे वयोमानानुसार त्यांची प्रकृती पक्षाचे कामासाठी बाहेर पडण्यासारखे नव्हती. त्यामुळे आपल्या घरातून शेकापचे कार्यकर्त्याने मार्गदर्शन करण्याचे काम लक्ष्मण पेमारे सतत करीत होते.त्यांनी शेवटचा जाहीर कार्यक्रम 2020 मध्ये नेरळ येथील हुतात्मा चौक येथील मध्यरात्रीच्या ध्वजारोहण कार्यक्रम सहभागी झाले होते.तेथे सहभागी होत रात्री बारा वाजून एक मिनिटांनी तिरंगा ध्वज फडकवला होता.नेरळ मधील चंद्रकांत जयवंत आणि लक्ष्मण पेमाते हे रायगड जिल्हा शेकाप मधील धुरंधर समजले जायचे,आज ते दोघेही या जगात नाहीत.
शेतकरी कामगार पक्षाचा 76वा वर्धापन दिन पाली येथे 2ऑगस्ट रोजी साजरा झाला.त्याच दिवशी रात्री दहा वाजता लक्ष्मण पेमारे यांनी अखेरचा श्वास घेतला होता.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शेतकरी कामगार पक्षाचे आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अंत्यसंस्कार प्रसंगी नेरळ येथील स्मशान भुमीमध्ये उपस्थित होते.सध्या त्यांचे वास्तव्य असलेल्या लव्हालवाडी येथील घरातून निघालेली अंत्ययात्रा एक किमी लांब पर्यंत पोहचली होती.त्यांना लाल बावाठयाची सलामी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा पुरोगामी युवक संघटेनेच्या पदाधिकारी यांनी दिली.