लक्ष्मण ठाकूर यांचे निधन

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील सामाजिक कार्यकर्ते व वांगणी या गावचे रहिवासी लक्ष्मण गणपत ठाकूर (55) यांचे शनिवार, दि.9 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत परिवाराचे सात्वंन केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, तीन बहिणी यांच्यासह मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी व अंतिम धार्मिक विधी सोमवार, दि.18 एप्रिल रोजी वांगणी येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version