30-40 किलोमीटर पायी चालत सोडले खारकिव

| अलिबाग | भारत रांजणकर |
रशियाच्या बॉर्डर जवळ असलेल्या आणि सातत्याने बॉम्ब ग्रेनेड हल्ले होत असलेल्या धोकादायक ठरलेल्या खारकीव्हमध्ये दोन भारतीय विद्यार्थ्यांनी प्राण गमावल्यानंतर अडकून पडलेले जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांसह सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी प्राण हातात घेऊन खारकिव्ह सोडण्याचा मोठा निर्णय घेतल्याचे विजया माने हिचे पालक मल्हारी माने यांनी सांगितले. मात्र या विद्यार्थ्यांना खारकिव्ह स्टेशनमध्ये रेल्वेतून जाण्याच मज्जाव करण्यात आल्याने शेवटी हे विद्यार्थी पायी चालत खारकिव्ह सोडण्यास जिवावर उदार झाले. रात्रभर रस्ता तुडवत डोळ्यांसमोर बॉम्ब हल्ले पहात, जीव वाचवत 30 ते 40 किलोमीटर अंतर काल रात्री 8 च्या सुमारास रशियाच्या सिमेजवळ सुखरुप पोहचले. मात्र त्यांचे तिथे खुप हाल होत असून त्यांची खाण्यापिण्याची देखील अबाळ होत असल्याचे सांगण्यात येते. अर्ध्यातासावर रशियाची सिमा आहे. मात्र त्यांना उशिरापर्यंत प्रवेश देण्यात आला नव्हता. एकदा का रशियात प्रवेश मिळाला की हे विद्यार्थी तिथून आपल्या मायदेशात परततील अशी अपेक्षा मल्हारी माने यांनी व्यक्त केली.

Exit mobile version