। चिरनेर । प्रतिनिधी ।
एस.के. महाविद्यालय सिवूड सायन्स आणि कॉमर्स कॅम्प अंतर्गत आवरे येथील भोलेनाथ मंदिरात ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दैनंदिन जीवनातील परिस्थिती पाहता लोकांनी कचरा व्यवस्थापन तसेच स्वछतेचे नियम पाळले तर मानवी जीवन निरोगी राहू शकते. यामध्ये प्रामुख्याने मलविसर्जनाची स्वतंत्र सोय, साफसफाई, स्वच्छता, मानवी घनकचर्याचे व्यवस्थापन या गोष्टी महत्त्वाच्या असून त्या पाळणे अत्यंत गरजेचे आहे, असा सल्ला यावेळी मान्यवरांनी व्याख्यानातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. यावेळी, नागेंद्र म्हात्रे, निवास गावंड, सचिन पाटील, अर्चना सिंग, सृजल धुमाळ, जित म्हात्रे, अविनाश राजपूत, आविष्कार पतील आणि शिबिरातील सर्व शिबिरार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन निवास गावंड तर निहरिका शिंदे हिने आभार व्यक्त केले.