। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण कोमसाप मधुबन कट्ट्याचे कवी संमेलन उरण येथील विमला तलाव येथे शुक्रवारी (दि.17) सायंकाळी 5.00 वाजता प्रा. एल.बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. काव्य संमेलनात देशभक्तीपर विषयांवर काव्यवाचन तसेच क्रांतिवीरांच्या जीवनावर आधारित चारोळ्या सादर होणार आहेत. विशेषतः या काव्य संमेलनाच्या कार्यक्रमात जीव रक्षक बोट कॅप्टन सुनील कोळी आणि समालोचक व निवेदक श्याम ठाकूर यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
दरम्यान, कार्यक्रमात गझलकार आप्पा ठाकूर यांची गझल ऐकावयास मिळणार आहे. तर, यावेळी अशोक ठाकूर हे हिप्राटाईज व आरोग्य सल्ल्यावर मार्गदर्शन करणार आहेत. कोमसाप उरणचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हात्रे, उरण मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, कोमसाप जिल्हा प्रतिनिधी संजय होळकर, कोमसाप उरण कार्याध्यक्षा रंजना केणी, समता ठाकूर, अजय शिवकर आणि कोमसाप उरणचे सर्व सदस्य या कवी संमेलनाच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. अशी माहिती कोमसाप उरण तर्फे देण्यात आली आहे.