। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील श्री साई धाम पालखी पदयात्रा सेवा संस्था रांजणपाडा-आवासतर्फे सोमवारी (दि.6) रांजणपाडा ते शिर्डी पदयात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. या पालखी सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मंडळाचे हे बारावे वर्ष असून गेले अनेक वर्ष मंडळाचे अध्यक्ष बंटी वाकडे, पदाधिकारी शरद थळे, आशिष शिरगावकर, संतोष म्हात्रे, संजय पाटील, धर्मा कोळी व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे कार्य या पालखी सोहळ्याला लाभत असते. यावेळी, पालखीचा शुभारंभ वाद्यांच्या गजरात व फुलांचा वर्षाव करत उत्साहात करण्यात आला. रांजणपाडा ते शिर्डी मार्गावरील अनेक ठिकाणी सर्व स्तरातील मान्यवरांनी व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान, ‘साईबाबा की जय’ या नामघोषाने परिसर भक्तीमय झाला होता.