। मुंबई । प्रतिनिधी ।
चीनमध्ये कहर करणार्या एचएमपीव्ही व्हायरसची प्रकरणं आता भारतातही दिसू लागली आहेत. मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे. एका 6 महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. या चिमुकलीला उपचारासाठी हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुलगी 1 जानेवारीपासून रुग्णालयात दाखल होती. मात्र आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे.
ह्युमन मेटापन्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा श्वासोच्छवासाच्या आजारांना कारणीभूत ठरणारा व्हायरस म्हणून ओळखला जातो. आता भारतातही या व्हायरसचे रुग्ण आढळत आहेत. कर्नाटकात एचएमपीव्हीची दोन प्रकरणं नोंदवली गेली असताना मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.