मुंबई | प्रतिनिधी |
शिवाजी पार्क, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात मंगळवारी(2 नोव्हेंबर) श्री धन्वंतरी पूजन आणि आयुर्वेदावर व्याख्यानाचा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. भविष्यातील आयुर्वेदाची उपयुक्तता या विषयावर वैद्य श्याम हरिहर नाबर यांचे व्याख्यान होणार आहे. आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई आणि वैद्यराज व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम असल्याची माहिती स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि स्मारकाच्या आयुर्वेद केंद्राचे संचालक वैद्य चिंतामण साठे यांनी दिली.