चोंढी महाविद्यालयात मराठी भाषेविषयी व्याख्यान

| अलिबाग | प्रतिनिधी |
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय चोंढी- किहीम महाविद्यालयामध्ये मराठी विभाग व ग्रंथालय विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोमवार, दि. 20 मार्च रोजी ‘मराठी भाषेचे भवितव्य’ या विषयावर प्रा.डॉ. अनिल बांगर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात होते. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार, दि. 17 मार्च रोजी ‘मराठीमध्ये स्वाक्षरी’, तर 18 मार्च रोजी ‘शब्दकोडे’ हा उपक्रम राबविण्यात आला. मराठी भाषेचे भवितव्य व्यक्त करताना मराठी भाषेला भविष्यात उज्ज्वल भविष्य आहे, असे मत बांगर यांनी व्यक्त केले व कुसुमाग्रजांच्या अजरामर वाङ्मय साहित्याचा आढावा घेतला. महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रतीक्षा कागे व स्नेहा झिराडकर यांनीही कुसुमाग्रजांच्या स्मृतींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रवेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचा विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनमुराद आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रेया साळुंखे या विद्यार्थिनीने केले.

Exit mobile version