वृद्धापकाळातील मानसिक आरोग्य विषयावर डॉ.अनिल डोंगरे यांचे व्याख्यान संपन्न

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मेंदूतील रासायनिक बदलामुळे वार्धक्यात नैराश्य, रितेपणा व विस्मरण आदी विकार लहानमोठ्या प्रमाणात बळावतात. त्यातील काही विकार प्राथमिक पातळीवर समुपदेशनानेही बरे होतात, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांनी सांगतले. रविवारी 9 जानेवारी रोजी शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम आणि विरंगुळा केंद्रातर्फे माजी निवासी उपजिल्हाधिकारी स्व. दीनानाथ तरे यांच्या सुयोग निवासस्थानी भारती तरे सभागृह, श्रीबाग डॉ. अनिल याचे ’वृद्धापकाळातील मानसिक आरोग्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम आणि आणि विरंगुळा केंद्राचे डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. किरण नाबर, डॉ. प्रशांत जन्नावार हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ.डोंगरे यांनी वृद्धापकाळात मानसिक आरोग्य कसे राखावे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रारंभी शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम आणि आणि विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. कोरोनाचे नियम पाळून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानास शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम आणि विरंगुळा केंद्राचे पदाधिकारी व सदस्य असे एकूण 45 जण उपस्थित होते.

Exit mobile version