क्रिकेटचे दिग्गज खेळाडू उतरणार मैदानात

18 नोव्हेंबरपासून लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा
| डेहराडून | वृत्तसंस्था |
सध्या प्रत्येक क्रिकेट प्रेमी विश्वचषकाचा थरार अनुभवत आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. अशातच निवृत्त झालेले क्रिकेटर मैदानात पुन्हा दिसणार आहेत. लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. लिजेंड्स लीगचे सामने डेहराडूनसह देशातील पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. लिजेंड्स लीगमध्ये क्रिकेट जगतातील बड्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. हे खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

18 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट टी-20 स्पर्धेचा अंतिम सामना 9 डिसेंबर रोजी सुरत येथे खेळवला जाईल. या 20 स्पर्धेचे सामने 24 नोव्हेंबरपासून डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या टी 20 स्पर्धेत एकूण 19 सामने खेळवले जाणार आहेत. रांची इथून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रांचीत 18 ते 23 तारखेपर्यंत 5 सामने होणार आहेत.

डेहराडूननंतर 24, 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी डेहराडूनमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तीन सामने होणार आहेत. त्यानंतर 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान जम्मूमध्ये 4 सामने होणार आहेत. जम्मूनंतर विशाखापट्टणममध्ये 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान 3 सामने होणार आहेत. उपांत्यपूर्व ते अंतिम फेरीपर्यंतचे पाच बाद सामने सुरतमध्ये होणार आहेत.

या स्पर्धेत क्रिकेट जगतातील ज्येष्ठ खेळाडू आपले हात आजमावताना दिसतील, ज्यांनी इतिहासाच्या पानांवर आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. या क्रिकेट लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, ख्रिस गेल यांच्यासह अनेक परदेशी खेळाडू मार्की खेळाडू म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेत प्रेक्षकांना मैदानावर सामना पाहण्यासाठी तिकीटही काढावं लागणार आहे. तिकिटाच्या किमती 299 पासून सुरू होतात. डेहराडून इथं होणाऱ्या या स्पर्धेच्या सामन्यांसाठी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये तयारी जोरात सुरू आहे. क्रिकेट स्टेडियमची अवस्था पूर्वीसारखीच बदलली आहे. 24 नोव्हेंबरपासून होणाऱ्या टी-20 सामन्यांसाठी डेहराडूनमधील लोकही खूप उत्सुक आहेत.

Exit mobile version