लिंबूचे भाव कडाडले

हॉटेलातून लिंबू गायब
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
ऐन उन्हाळ्यात लिंबूचे भाव अगदी अटकेपार गेल्याने लिंबू बाजारातून जवळजवळ गायब झाले आहेत. मुरूड मध्ये प्रति लिंबू 10 रूपये प्रमाणे विक्री करावी लागत असल्याची माहिती मुरूड मार्केट मधील जेष्ठ भाजी विक्रेते शशिकांत कोळवनकर यांनी दिली.

उन्हाळ्यात लिंबू आधिक महत्वाचे फळ असून लिंबू सरबताला प्रचंड मागणी असते. परंतु सध्या अचानक लिंबूचे भाव 10 पट झाल्याने ग्राहकांना कसे समजावे हा प्रश्‍न भाजीविक्रेत्यांपुढे पडल्याचे कोळवनकर यांनी सांगितले. 100 लिंबू खरेदी केले तरी त्या मध्ये 7 ते 8 लिंबू खराब निघाले तर फायदा तर न मिळता नुकसान होऊ शकते तरीही ग्राहकांसाठी भाज्यांबरोबर थोडे लिंबू विक्रीस आणवेच लागतात अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मुरूडमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेल्समधून लिंबू गायब असून मिसळ, खिमा, आम्लेट यांच्या बरोबर लिंबूची फोड देणे देखील परवडणारे नाही अशी माहिती मालक वर्गाने दिली.

Exit mobile version