। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीच्या परिसरात बिबट्या दिसल्याचा घटना कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. कंपनीच्या मेन गेटमधून तो आत गेल्याचे कॅमेर्यात कैद झाले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाचे अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले आहे. याबाबत आरसीएफ कर्मचार्यांना विचारणा केली असता गेले तीन दिवस वन विभाग बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर तेथील कर्मचार्यांनी सांगितले.
याबाबत आरसीएफ प्रशासनानेदेखील या घटनेला दुजोरा दिला असून आरसीएफ कारखाना परिसरात बिबट्या आढळल्याचे सांगण्यात आले. तसेच कर्मचार्यांनी तसेच ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबत आरसीएफ प्रशासनाने वनक्षेत्रपाल, अलिबाग यांना माहिती दिली असून बिबट्याचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.